🔹‘व्हायब्रन्ट गुजरात’दरम्यान 25 हजार समझोते करार
10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान 25,578 समझोते करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली. मात्र या करारांतून किती प्रमाणात विदेशातून आणि देशी उद्योजकांकडून राज्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे याची माहिती राज्य सरकारकडून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. यावर्षी या संमेलनाचा हा आठवा भाग होता. गेल्या सात भागात राज्यात किती गुंतवणूक करण्यात येईल याची माहिती देण्यात आली होती. 2015 मध्ये एकूण 22,602 समझोते करार करण्यात आले होते आणि या माध्यमातूत 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करण्यात आली होती. यंदा संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment