-------------------------
*देवघर व देव्हारा*
--------------------------
*देवघर व देव्हारा कसा व कोणत्या दिशेला असावा.याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन.*
● प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे.
● ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्टया स्मशानवत आहे.
● आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र रहात असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे.
● देवपूजे शिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते.
● ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचाच संसार असतो.
● ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही, ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवनच असते.
● कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीने च व्हावेत.
--------------------------------------
● ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे, देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी.
● वास्तुच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते.ईशान्य कोपरा शक्य नसल्याल,उत्तर भिंतीचे बाजूस मध्यावर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकड़े तोंड करुन देव्हारा चालेल.
देव्हारा वास्तुच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अति पीड़ा उद्भवतात.
● देव्हारा क्षयनगृहात सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्या समोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनचि व्यवस्था कायमस्वरूपी करावी.
● पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे.पूजाघराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळा असावा.घरातील आग्नेय कोपऱ्यात दिप अगर लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य असावा.हवन देव्हाऱ्याच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वे कड़े तोंड करुन करावे.
● देवाचे फ़ोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत.
पशु, पक्षी ,महाभारताचे युद्धप्रसंगाची चित्रे लावू नयेत.
* देव्हाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी.
* पूजाघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फ़ोटो अजिबात लावू नयेत.
* पूजाघरास उंबरठा अवश्य असावा.
* देव्हाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असु नये.
----------------------------------------
● पूजाघर भिंतीत कोरुन करु नये.अगर देव्हारा संपुर्ण भिंतीत चिकटवुन ठेवू नये.पूजा घरात अड़ळीच्या वस्तु ठेवू नयेत. प्राचीन मुर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये.
● देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ति अगर तसबिरि असाव्यात.
कुलदेविचा टाक,मुर्ति अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फ़ोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण,नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंच धातुची असावी.
डाव्या सोंडेचा गणपति,
2 ते 3 यंत्रे असली तरी चालतील.यन्त्रे ही देवाची आसने असल्याने ती उभी मांडू नयेत,जमिनीशि समांतर मांडावीत.
एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पुजेत असू नयेत,त्या दोन्ही एकहि कार्य करीत नाही.मात्र एकाच देवतेची मूर्ती व तसबीर (फोटो) असेल तर हरकत नाही.
● दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडित घराण्याचे (वंशज नसलेले घराणे) देव देवघरात अजिबात पुजू नयेत.ते सर्वच विधिवत विसर्जन करुन नवीन देव करावेत.सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे.नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबूडी होते.
---------------------------------------
१)देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फ़ोटो पुजू नयेत.घराचे वातावरण स्मशानवत होईल.कारण भगवान शंकराचे सगुणरूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरुपात मानले जाते.
२) संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता ( धोका ) असते.
३) देव्हाऱ्यात शनिचि सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते.
४) घरात मारुतिचा फ़ोटो कुठेही असल्यास चालेल पण देव्हाऱ्यात नको.
५) मुंज पूजा सुद्धा करू नयेत.त्यामुळे इतर देव देवता आपले काम करीत नाही.शिवाय त्या मुंजास सद्गगतिपासुन बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात.
६) देव्हाऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये.कारण गायत्री मातेचे स्वरुप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवा शिव पाळणे खुप कठिन आहे.विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही.
७) देवघरात कालभैरवची पूजा देखील निषिद्ध आहे.ते यम असून स्वभाव अतिउग्र व कड़क आहे.
८) म्हसोबा सुद्धा देवघरात पुजू नये. त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर रहात नाही.कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीड़ित असते.
९) देव्हाऱ्यात पीराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये, त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही.
१०)गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो.
---------------------------------------
● देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत,नाहीतर ते आपलीच शोभा करतात.
● देव्हाऱ्यातिल मूर्ती 3 इंचपेक्षा मोठ्या नसाव्यात.जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे.
● देवांना माशी लागलेली असू नये.
● देव भग्न छिद्र पडलेले ,आसन-आयुधे हालत असलेली चिर गेलेले देव,विद्रूप झालेले,पाण्यात टाकल्यावर बुड़बुडे येणारे देव नसावेत.ताबडतोब विसर्जन करुन नवीन मूर्ति स्थापन कराव्यात.
● देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात.
बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव
देवघरात पुजू नयेत.आसरा देखील देवघरात पुजू नये.आसऱ्यांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे.
● देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा.त्याशिवाय घरात कुणी जेवण करू नये. सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांना जेवण खावु घालायचे असेल तर उष्टे व्हायचे अगोदर देवाचा नैवेद्य बाजूला काढून नंतर नवेद्य दाखविला तरी चालते.
जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात, त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाचि कमतरता पडत नाही हे एक शाश्वत सत्य आहे.
देवाच्या मूर्ती उत्तरेकडे तोड़ करुन असल्या तर नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पूर्व- पश्चिम , या दिशांना तोंड करुन दाखवावा.
------------------------------------ श्री स्वामी समर्थ