Saturday, January 27, 2018

कावड्यांचे महत्व

कवड्याच्या माळांचे महत्व काय?
का प्रिय आहे जगदंबा व आराधी लोकांना कवड्या माळेचा शृंगार?
कवड्या माळा गळ्यात घातलेले व्यक्ती रस्त्यावरुन जाताना दिसले तर काही लोक त्या व्यक्तिंना कमी लेखतात.वा हिडीसफिडीस करतात. अपवाद काही लोक त्रास देत असतीलही म्हणुन सर्वच जण तसे असतात असे नाही. कवडी हे देवी पुजेतील अत्यंत महत्वाचे साधन आहे. कवडी महात्म्य शब्दात वर्णन करणे शक्य नाही.तरी देखिल काही जणांच्या आग्रहावरुन माझ्या अल्प मतीनुसार ही माहीती देत आहे. कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे. तिच्या महात्म्याच्या वर्णनात एक दंत कथा माझी आक्का सांगायची....
शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले' त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडी कडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण; त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनिंच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणुन देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन ईंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजु घेऊन एका पारड्यात कवडी व दुसय्रा पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेरभांडार खाली झाले ; किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागुन देवराज ईंद्राने स्वत:चा मुकुट देखिल पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीतोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज ईंद्रासह सर्व देव शिव शक्ति समिप आले.अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ ईंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली .(हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे ईंद्र व चंद्र देवानी बांधले असुन. ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तिर्थांना ईथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तिर्थ होय ) तेव्हापासुन कवडीला अपार महत्व प्राप्त झाले.
एवढेच काय एके काळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणुन अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातुन निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.
आपणही कालोघात विसरलो म्हणुन की काय पण कधीतरी म्हणतोच
" काय कवडी किंम्मत केली "
"कवडीमोल विकले गेले "
आता आराधी लोकांत कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणुन आराधी आजही अनमोल अशा कवड्यासाजाचा शृंगार करतात. त्यांना तो जिवापाड प्रिय आहे.
कवड्यांचे प्रकार किती व कोणते?
तसे पाहता बय्राच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात.परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.
1)महालक्ष्मी कवडी (कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.)
2)आंबिका बट कवडी (खडबडीत व पिवळसर रंगाची )
3)येडेश्वरी कवडी (राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा )
4)यल्लम्मा कवडी (शुभ्र व दुधासमान निश्कलंक )
आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. जिवनातील अडचणींच्या उपायामधे योग्य मार्गदर्शनाने कवड्यांचा वापर करता येतो.
कवडिला लक्ष्मी चे प्रतिक मानले जाते समुद्रातुन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मी शी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मी ची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मी ची उत्पत्ति समुद्रातुन्न झालेली आहे. कवडीचा सम्बन्ध भगवान् शंकरांशी सुद्धा जोडला जातो त्यांच्या रुळणार्या जटांचे रंग रूप कवडिशि मिलते जुलते आहे. म्हणून त्यांना कपर्दिक असे म्हणतात. शिवांच्या 18 आभूषनापैकी कवडी एक आहे. कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग 1) बंध्या रुपया बरोबर 3 तपकिरि कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरित ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्या कड़े निरंतर राहील व् दरवर्षी याची लक्ष्मी पूजन च्या दिवशी याची पूजा करावी. 2) एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परिक्षे साठि इंटरव्यू साठी जात असाल तर घरा बाहर पड़तांना 1 पांढरी कवडी उजव्या खीशांत ठेवावी कार्य यशश्वी होते 3) नविन वाहना ला काळ्या दोर्यात ओवलेली तपकिरि कवडी दिवे लाग्निच्या वेळी बांधल्यास अपघाता चे भय राहत नाही. 4) दुकानाच्या गल्ल्यात 3,5,7 अश्या विषम संखेत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरु राहतो 5) लहान बालकांना दृष्ट लाग्न्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोर्यात ओ उन बांधावि 6) ज्याच्या कड़े लक्ष्मी माते ने पाठ फिरवली आहे अश्या लोकांनी 7 पांढर्या कवडी केशर मिश्रित हलदी चा लेप लावावा व् त्या नव्या कोरया पिवल्या कापड़ा त गुंडालुन् देवार्यात ठेवाव्या लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल 7) काही कारणाने पति पत्नी मधे भांडण होऊंन संसार उध्वस्त होणार असेल तर 21 पांढर्या कवडी ची माळ उशी खाली ठेवावी अल्पावधित वादळ शांत होईल व् जीवन सुखी होईल. 8) लहान मुलांना दात येतान्ना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घाटल्याने दांत विना त्रासाने येतात.
9) कवड्यांचे  तोरण जर बाहेर असणा-या प्रमुख दरवाजांना बांधले तर बाधिक पीडा घरात प्रवेश करित नाहित घरात सुख शांती समृध्दी नांदते आदेश आदेश

No comments:

Post a Comment