Saturday, October 14, 2017

आयुर्वेद

*डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर* यांच्या व्याख्यानातील काही महत्त्वाच्या आरोग्यदायी *टिप्स...*

👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *आंघोळ* करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*

२) *पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.

३) *रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.

४) *रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.

५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) *वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.

७) *रोज ४* सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) *रोज* एक चमचा पांढरे तीळ खाणे - *हाडे मजबूत होतात.*

९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा *शुद्ध संजीवनी* १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.*

15) *लिंबू* घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) *५ ते ६* चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.*

१७) *तुळशीच्या* पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) *पोटाच्या आजारावर -* वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) *कानाच्या पडद्याला भोक -* उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) *हात पायाला घाम येणे -* सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) *लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर*- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) *तुरटीच्या* पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर *हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.*

      *डॉ.स्वागत तोडकर*

*चेअरमन,संजीवनी आयुर्वेदीक*

         चिकित्सालय, *कोल्हापूर*

आयुर्वेद

*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र*

*१) वात २) पित्त ३) कफ*
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
      *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
----------------------------------------------
१) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

२) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि *प्रार्तविधी* करुन घ्यावा.

४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना *गरम पाणी* कधीच वापरु नये.

६) सकाळी *७.३० ते ९.३०* च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) *जेवणाच्या अगोदर* *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी  प्यावे.* जेवताना *एक ते दोन घोट* पाणी प्यायला हरकत नाही.

८) *सकाळी फळांचा ज्युस प्या*  दुपारी *दही ताक किंवा मठ्ठा प्या* आणि  *झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.*
९) नेहमी *पाणी* पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे *उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.*
( *शरीराला दररोज लाळेची गरज असते* जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी *घोट घोट* करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर *१० ते १५* मिनीटे *वज्रासनात* बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी *(२० मिनीटे झोपावे)* घ्यावी. आणि *संध्याकाळी* जेवण केल्यावर *३ तास झोपू नये* व *शतपावली* करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी *मातीच्या* भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) *झोपताना* नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
*फिल्टर तेलच वापरा. * (रिफाईंड तेल विष आहे)*

१५) *सेंन्द्रिय गुळाचा* वापर करावा. *(साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)*

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा *गुळ* खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त *सेंधा मीठ* वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी *६ ते ७ तास झोप* आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज *एक तास प्राणायाम,* *१५ मिनीट योगासने,* व जेवढे जमेल तेवढे *सूर्यनमस्कार* करणे.

२०) *प्राणायाम* मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज न चुकता *एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.* तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.

२२) *जास्त* वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

२३) *भारतीय* रस म्हणजे *उसाचा रस,कोकम* *सरबत,आवळा रस, लिंबू* *सरबत, फळांचा ज्युस* हेच आपल्या शरीराला *उत्तम पोषक* आहेत.

२४) भारतीय *पोशाख* घाला व तो *सैल* असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो *पांढराच* असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये *८४* प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
*लघवीला* आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, *अश्रू* बाहेर येवू द्यावेत, * *रडायला* आले तर ऱडावेच, *हसायला* आले की भरपुर हसावे, *जांभई* आली की द्यावीच, *शिंक* आली की बिनधास्त द्यावी , *अपानवायू* आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

२६) *कफ* कधीच *गिळू* नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो

आयुर्वेद

*महागुणी आरोग्यदायी – गुळ*

*रक्ताची शुद्धी*
नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
*उत्तम पचन क्रिया*
गुळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळ जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ तर रामबाण उपाय आहे.
*ऊर्जा स्त्रोत*
साखर ही फक्त गोडवा देते आणि एक आधुनिक प्रकार आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात.
हाडांचा मित्र
गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या *सांधेदुखीपासून* आराम मिळू शकतो. दुध आणि गुळ हे एकत्रित हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे.
*अर्धशिशी* थांबते
ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी गुळ आणि शुद्ध तूप एकत्रित रिकाम्या पोटी खाल्ल्याने आराम मिळतो. गुळ हा अशावेळी लाभदायक ठरतो.
*वजन कमी* करण्यासाठी
गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे. त्यात आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी जतन करून ठेवण्याची सवयसुद्धा गुळाने मोडण्यास मदत करते व आपले वजन कमी होते
.
*सर्दी-खोकल्यावर गुणकारी*
साधारण सर्दी-खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गुळ मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. रात्री झोपण्याआधी गुळ चोकून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.
रक्तक्षय टाळतो
गुळात प्रचंड प्रमाणात *लोह* आहे. तो खाल्ल्याने शरीरातील लोह कमतरता भरून येते. त्याच्या सेवनाने लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते व *अशक्तपणा* जाणवत नाही. थकवा आणि कमी ऊर्जा असे विकार गुळ खाल्ल्याने होत नाहीत.
*स्त्रियांसाठी* उपयुक्त
मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गुळ खूप गुणकारी आहे. त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यास मदत करतात. ओटीपोटातील दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर गुळ हा सोपा आणि स्वस्थ उपाय आहे.
त्वचा आणि केसांचे आरोग्य
सुंदर, लांब सडक आणि चमकदार केसासाठी गुळाचे सेवन आवश्य करा. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी भरलेला गुळ त्वचेवर एक छान चमक आणतो आणि सर्व मुरुम, पुरळ आणि डाग नाहीसे करण्यास मदत करतो.
रसायनमुक्त आणि पोषक गुळ आरोग्यदायी आहे. पण आपल्याला* *मधुमेह* किंवा अन्य काहीही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकणे फायद्याचे ठरेल.
🙏🏽🙏🏽🙏🏽.......