💥‼श्री स्वामी समर्थ ‼💥
👇🏻तारक मंत्र👇🏻
💥नि:शंक होई रे मना।
निर्भय होई रे मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥
💥जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई त्याला।
परलोकीही ना भिती तयाला॥२॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
💥उगाची भितोसी भय हे पळु दे।
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे।
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
💥खरा होई जागा श्रद्धेसहीत।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ।
नको डगमगु स्वामी देतील हात॥४॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
💥विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ५॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
🙏🏻श्रीस्वामीचरणारविंदार्पणमस्तु🙏🏻
No comments:
Post a Comment